
नांदेड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
नांदेड तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत केली आहे. यामध्ये 4 इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट केली. तसेच 20 तराफे जाळून नष्ट केले. या कारवाईत सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार संजय नागमवाड, सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी मोहसीन सय्यद, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव तसेच महसूल कर्मचारी बरोडा, श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, गिरी, मुंगल, सकवान महसूल सेवक बालाजी सोनटक्के आदी पथकातील अधिकारी उपस्थित होते.
वाहेगाव परिसरात अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असलेले महसूल पथकसला अवैध वाळू उत्खनन करणारे 4 इंजिन आढळून आले. पथकाने मजुरांच्या साहाय्याने ही इंजिन जिलेटीनने उडवून नष्ट केले. त्याचबरोबर वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे 20 तराफे जाळण्यात आले. असे एकूण 24 लाख किंमतीचा मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला.
बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच आवश्यक असल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis