
जळगाव , 14 नोव्हेंबर (हिं.स.) तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी कीतीही प्रशिक्षीत असला तरी सतत बदलणारे नवीन तंत्रज्ञान अवगत करणे ही काळाची गरज असून आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटल मध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.एक दिवसीय प्रशिक्षण सत्रातून कर्मचायांनी परिस्थीतीवर मात करण्याचे धडे घेतले.
दि १४ नोव्हेंबर रोजी डॉ. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ.सिध्देश खांडे, डॉ. सय्यद झीशान,डॉ. आकांक्षा पाटील यांनी देखिल यावेळी मार्गदर्शन केले. आपात्कालीन परिस्थीतीत त्वरित आणि कुशल प्रतिसादाचे महत्त्व यावेळी विषद करण्यात आले. यावेळी प्रात्याक्षिकासाठी एक मनुष्य पूतळयाच्या माध्यमातून सीपीआर योग्यरित्या कसे करावे,आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला पुढील दुखापत कशी टाळायची, वेळेवर हस्तक्षेप करून रुग्णांचे परिणाम सुधारण्याचे मार्ग, रुग्णांची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले, ज्यामुळे गंभीर परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी नर्सिंग कर्मचार्यांची तयारी आणि आत्मविश्वास वाढला.
वैद्यकिय क्षैत्रात नवनवीत तंत्रज्ञान विकसित होत असून कामाच्या व्यापात अनेक वेळा इच्छा असूनही तंत्रज्ञान अवगत करण्याची इच्छा असतांनाही वेळ मिळत नाही. परंतू आजचे चर्चा व प्रशिक्षण सत्रातून रूग्णालय व्यवस्थापनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली अतिशय स्तुत्य उपक्रम असल्यांची भावना सिस्टर चिन्मया चौधरी यांनी व्यक्त केली.
एमबीबीएस झाल्यानंतर अशा प्रशिक्षण कार्यक्रमातून ज्ञानात भर तर पडतेच पण नॉलेज अपडेट होते. आजचा कार्यक्रम ज्ञानवर्धक असल्याची भावना रूग्णालय व्यवस्थापक डॉ. संस्कृती भिरूड यांनी बोलून दाखवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर