अमरावती : विचारा इस्लाम' पोस्टर प्रकरणी चौकशीचे आदेश
अमरावती, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती शहरात लावण्यात आलेल्या ''विचारा इस्लाम'' या पोस्टरची महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण
विचारा इस्लाम' पोस्टर, पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश


अमरावती, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती शहरात लावण्यात आलेल्या 'विचारा इस्लाम' या पोस्टरची महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालकमंत्री बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांकडून यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती घेतली. अमरावतीचे सामाजिक वातावरण कोणत्याही परिस्थितीत बिघडता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले. असे प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असेही ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी अमरावतीमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. आता 'विचारा इस्लाम' आशयाचे पोस्टर दिसत आहेत, हा प्रकार अयोग्य असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. शहरातील पंचवटी चौक परिसरात हा उपद्रव झाल्याचे समोर आले आहे. या पोस्टरखाली एक टोल-फ्री नंबर असून, तो हैदराबाद आणि चेन्नई येथून ऑपरेट होत असल्याची माहिती मिळाली आहे. पोस्टरवर 'आयसीसी' असे लिहिलेले असल्याने, त्यामागील उद्देशाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजधानीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पोस्टर्स कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ही पोस्टर्स लावण्यामागे नेमका कोणता हेतू आहे, याचा तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले. पोलिसांनी किंवा महापालिकेने यासाठी परवानगी दिली होती का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्यासही पालकमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितले.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande