
- विधानसभेच्या 243 जागांपैकी 88 जागांचे निकाल जाहीर
- निकालांमध्ये भाजप 44 आणि जेडीयू 28 जागांवर विजयी
पटणा, 14 नोव्हेंबर (हि.स.), बिहार विधानसभा निवडणुकीत 243 पैकी 88 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पैकी भाजपाने 44, जेडीयूने 28, राजदने 6, लोजपा-आरने 3, एआयएमआयएमने 4, काँग्रेसने 1, हमने 1, सीपीआय-एम-एलने 1, आणि सीपीआय (एम) ने 1 जागा जिंकली आहे.
राज्यातील243 पैकी उर्वरित 155 जागांमध्ये 48 जागांवर भाजप, 55 वर जेडीयू, 19 वर राजद, 15 वर लोजपा-आर, 5 वर काँग्रेस, 1 वर एआयएमआयएम, 4 वर हम, 4 वर रालोमो, 1 वर सीपीआय-एमएल, 1 वर आयआयपी, 1 वर सीपीएम, आणि 1 जागेवर बसपा आघाडीवर आहे. अनेक जागांचे अंतिम निकाल यायचे बाकी आहेत, तरीही राज्यातील चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. राजगची दमदार पुनरागमन होत असून महागठबंधनची आशा फिकी पडत आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कलांमध्ये भाजप, नीतीश कुमार यांची जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या लोजपा-आरने मिळून जवळपास ‘200 पार’ आघाडी मिळवली होती.
आत्तापर्यंत जाहीर झालेल्या 88 विजेत्यांमध्ये भाजपच्या अनेक उमेदवारांचा समावेश आहे. सिकटीतून विजय कुमार मंडल, बनमनखीमधून कृष्णा कुमार ऋषी, पूर्णियांमधून विजय कुमार खेमका, कटीहारमधून तारकिशोर प्रसाद, आणि कोरहामधून कविता देवी यांनी विजय मिळवला आहे। तसेच दरभंग्यातून संजय सरावगी, हायाघाटमधून रामचंद्र प्रसाद, कैवटीतून मुरारी मोहन झा आणि औराईतून राम निषाद यांनीही पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे.
राज्यातील इतर महत्त्वाच्या जागांमध्ये—
बरुराजमधून अरुण कुमार सिंह, साहेबगंजमधून राजू कुमार सिंह, गोपालगंजमधून सुभाष सिंह, सीवानमधून मंगल पांडेय, बानियापूरमधून केदारनाथ सिंह, बिहपुरमधून कुमार शैलेंद्र, काटोरियातून पुरन लाल तुडू, मुंगेरमधून कुमार प्रणय, बाढहमधून सियाराम सिंह, डिगहामधून संजीव चौरसिया, बांकीपुरातून नितीन नवीन, कुम्हरारमधून संजय कुमार, पटना साहिबमधून रत्नेश कुमार, दानापुरातून रामकृपाल यादव, विक्रममधून सिद्धार्थ सौरव, बरहरामधून राघवेंद्र प्रताप सिंह, तरारीतून विशाल प्रशांत, गुरुआमधून उपेंद्र प्रसाद आणि गया टाउनमधून प्रेम कुमार यांनी विजय मिळवला आहे.
या व्यापक विजयातून स्पष्ट होते की बिहारमधील अनेक महत्त्वाच्या भागांत भाजपने मतदारांचा विश्वास कायम ठेवला असून राज्यातील पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे। अनेक जागांवर मोठ्या मतांतराने मिळालेल्या वाढत्या आघाड्या हे दर्शवतात की या निवडणुकीतही भाजप सत्तेच्या समीकरणात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.--------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी