
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहारमध्ये भाजपा महायुतीच्या दणदणीत विजयानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेवत बिहारच्या जनतेने पुन्हा एनडीएला कौल दिला.
भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विकास, पारदर्शक शासन आणि सुरक्षिततेच्या आधारावर मतदारांनी ‘डबल इंजिन सरकार’ला पुन्हा साथ दिली आहे.. येत्या काळात बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल हा विश्वास आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis