जळगावात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
जळगाव , 14 नोव्हेंबर (हिं.स.)बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही यशस्वी झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. या वेळी आमदार सुर
जळगावात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष


जळगाव , 14 नोव्हेंबर (हिं.स.)बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही यशस्वी झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. या वेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक आयोगाने बिहारच्या २४३ जागांचे पहिले निकाल जाहीर केले आहे. कल्याणपूर मतदारसंघातून जेडीयूचे महेश्वर हजारी यांनी १,१८,१६२ मते मिळवली. त्यांनी सीपीआय-एमएलचे रणजित कुमार राम यांचा ३८,५८६ मतांनी पराभव केला. सीपीआय-एमएलचे रणजित कुमार ७९,५७६ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. जन सूरज पक्षाचे राम बालक पासवान १६,५७४ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या जागेसाठी २९ फेऱ्यांमध्ये मतांची मोजणी करण्यात आली. आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, एनडीएला बहुमत मिळतंय. अर्थात एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा एनडीएला झाला असून महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही यशस्वी झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. या वेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande