केकेआर संघाने टिम साउदी यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
मुंबई , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामापूर्वी डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होणार आहे. शनिवारी आयपीएलची रिटेन्शन लिस्ट जाहीर होण्याआधी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने मोठे पाऊल उचलले आहे. गुरुवारी शेन वॉटसन यांच्या नियुक्
केकेआर संघाने टिम साउदी यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती


मुंबई , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामापूर्वी डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होणार आहे. शनिवारी आयपीएलची रिटेन्शन लिस्ट जाहीर होण्याआधी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने मोठे पाऊल उचलले आहे. गुरुवारी शेन वॉटसन यांच्या नियुक्तीनंतर, शुक्रवारी संघाने घोषणा केली की टिम साउदी यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केकेआर ने अभिषेक नायर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले असून त्यांनी चंद्रकांत पंडित यांची जागा घेतली आहे. गुरुवारी फ्रँचायझीने जाहीर केले होते की ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू शेन वॉटसन यांना सहाय्यक प्रशिक्षक नेमण्यात आले आहे. वॉटसन म्हणाले होते – “कोलकाता नाइट रायडर्ससारख्या प्रतिष्ठित फ्रँचायझीचा भाग बनणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.” आता आणखी एका परदेशी प्रशिक्षकाच्या रूपात टिम साउदी केकेआर मध्ये परतले आहेत. ते या फ्रँचायझीसाठी 3 वर्षे खेळले होते.

केकेआर ने जारी केलेल्या निवेदनात साउदी म्हणाले, “ केकेआर मला नेहमी घरासारखे वाटले आहे आणि या नव्या भूमिकेत परत येणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. फ्रँचायझीची संस्कृती अद्भुत आहे, फॅन्स उत्साही आहेत आणि खेळाडूंचा एक उत्कृष्ट गट आहे. मी गोलंदाजांसोबत काम करण्यास आणि आयपीएल 2026 मध्ये संघाला यश मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे.”

साऊदीने 2021 ते 2023 दरम्यान केकेआर साठी 14 सामने खेळले असून 19 बळी घेतले. 2022चा हंगाम त्यांच्यासाठी विशेष ठरला होता—9 सामन्यांत 14 विकेट्स. 36 वर्षीय साउदी 2011 पासून आयपीएल खेळत होते. त्यांनी सीएसके, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबी साठीही खेळले आहे. आयपीएल मध्ये त्यांनी 54 सामने खेळून 47 बळी घेतले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande