जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन
नवी दिल्ली , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 125 वी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अभिवादन केले आहे.दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी नेहरूंची जयंती बालदिन म्ह
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि खरगे यांनी वाहिली श्रद्धांजली


नवी दिल्ली , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 125 वी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अभिवादन केले आहे.दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी नेहरूंची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने देशभरातील मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्साह, साजरा आणि आठवणींचे वातावरण असते.

पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात म्हणाले की, “आज आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची 125 वी जयंती साजरी करत आहोत. त्यांना माझे अभिवादन . आपण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानाची आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांच्या भूमिकेची आठवण करतो.” असे मोदींनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स वर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहले,“पंडित जवाहरलाल नेहरू यांची परंपरा ही एक शाश्वत प्रकाशस्तंभासारखी आहे, जी भारताच्या विचारांना आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांना—स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन—प्रकाशित करते. त्यांची दूरदृष्टी आपल्या अंतरात्म्याला प्रेरणा देते आणि आपल्या सामूहिक कृतींना आकार देते. भारताचे पहिले पंतप्रधान, सत्य, एकता आणि शांततेला मनःपूर्वक जपणारे असे महान नेते—त्यांना माझी श्रद्धांजली. आपल्या राष्ट्राच्या भविष्यासाठी बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

असे खरगे यांनी नमूद केलेय.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande