

नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय विवाहसोहळ्यांच्या हंगामाची सुरुवात होत असताना, भारतातील सर्वात विश्वासार्ह पारंपरिक दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या 'पीएनजी ज्वेलर्स'ने आपला खास असा विवाह संग्रह ‘प्रथा’ सादर केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा येथे या संग्रहाचा ग्राहकांना अनेक सवलतींसह लाभ घेता येणार आहे. हा संग्रह नव्या युगातील वधूसाठी परंपरेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे.
‘प्रथा’ म्हणजेच ‘परंपरा’. हा संग्रह भारतीय स्त्रीच्या सौंदर्य, भावना आणि कलात्मकतेचे प्रतिनिधित्व करतो. या नव्या कलेक्शनमध्ये सोने आणि हिरे जडित सुंदर ब्रायडल सेट्स, हार, कानातले, बांगड्या आणि मांगटिका यांचा समावेश आहे. प्रत्येक दागिन्याच्या डिझाईनमध्ये पारंपरिक नक्षीकाम आणि आधुनिक डिझाईन्सचा सुंदर मिलाफ दिसून येतो, जो आजच्या आत्मविश्वासू आणि समंजस वधूंसाठी खास तयार करण्यात आला आहे.
विवाह हंगामाच्या निमित्ताने पीएनजी ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ३० टक्के पर्यंत सूट आणि हिरे दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ७५ टक्के पर्यंत सूट. यासोबतच जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर ० टक्के कपात, ज्यामुळे प्रेम आणि परंपरेचं प्रतीक असणारे दागिने खरेदी करण्याची ही उत्तम संधी ठरते.
या मोहिमेबद्दल बोलताना, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ''प्रथा वेडिंग कलेक्शन म्हणजे वारशाची आणि भावनेची शाश्वत नाळ आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक डिझाईन वधूच्या नव्या प्रवासाची सखी बनावी, या उद्देशाने तयार केली आहे. या मोहिमेद्वारे आम्ही केवळ दागिने नव्हे, तर प्रत्येक विवाहामागील भावना, बांधिलकी आणि एकतेचा सुंदर उत्सव साजरा करतो.'
‘प्रथा’ कलेक्शनमध्ये भारतीय पारंपरिक कलाकुसरीचा वारसा जाणवतो, नव्या काळासोबत चालत असताना आपली मुळे जपायची आहेत, अशा महिलांसाठी हा संग्रह खास आहे. ठरावीक कालावधीसाठी चालणाऱ्या या मोहिमेचा उद्देश 'पीएनजी ज्वेलर्स'च्या सर्व शोरूम्समध्ये ग्राहकांची वर्दळ वाढवणे आणि ब्रँडशी असलेलं नातं अधिक दृढ करणे आहे. या उपक्रमातून पुन्हा एकदा ब्रँडचा नवकल्पना, कौशल्य आणि विश्वास या १९२ वर्षांच्या प्रवासात जपलेला वारसा अधोरेखित होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी