पोर्शे 911 टर्बो एस स्पोर्ट्स कार भारतात लॉंच
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। म्युनिकमधील आयएए मोबिलिटी ट्रेड शोमध्ये सप्टेंबर 2026 मध्ये अनावरण झालेली पोर्शेची नवी 2026 पोर्शे 911 टर्बो एस आता भारतीय बाजारात अधिकृतरीत्या 3.80 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध झाली आहे. हायब्रिड पॉवरट्रेन, आ
Porsche sports car 911 Turbo S


Porsche sports car 911 Turbo S


मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। म्युनिकमधील आयएए मोबिलिटी ट्रेड शोमध्ये सप्टेंबर 2026 मध्ये अनावरण झालेली पोर्शेची नवी 2026 पोर्शे 911 टर्बो एस आता भारतीय बाजारात अधिकृतरीत्या 3.80 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध झाली आहे. हायब्रिड पॉवरट्रेन, आधुनिक डिझाइन आणि उन्नत ड्रायव्हिंग डायनॅमिक्ससह ही कार 911 मालिकेतील आजवरची सर्वात शक्तिशाली प्रोडक्शन कार ठरली आहे.

नव्या कूपे आणि कॅब्रिओलेट स्टाइलमध्ये आलेल्या या मॉडेलमध्ये 3.6-लिटर ट्विन-टर्बो फ्लॅट-सिक्स टी-हायब्रिड इंजिन देण्यात आलं असून ते तब्बल 7१1 हॉर्सपॉवर आणि 800 एनएम टॉर्क निर्माण करतं. मागील आवृत्तीपेक्षा तब्बल 61 एचपीनं अधिक शक्ती देणारी ही युनिट 8-स्पीड डीसीटी सिस्टमद्वारे सर्वचाकी ड्राइव्हला सपोर्ट करते, ज्यामुळे परफॉर्मन्स आणि नियंत्रणाचा अनुभव अधिक तीक्ष्ण आणि रोमांचक होतो.

परफॉर्मन्सच्या बाबतीतही 2026 911 टर्बो एसने नवा मापदंड निर्माण केला आहे. ही कार 0 ते 100 किमी/ता वेग फक्त 2.5 सेकंदात आणि 0 ते 200 किमी/ता वेग 8.4 सेकंदात गाठते. तिचा कमाल वेग 322 किमी/ता असून, पोर्शेनं 2024 मधील विकास चाचण्यांदरम्यान या कारने केलेला 7:03.92 मिनिटांचा लॅप मागील मॉडेलपेक्षा तब्बल 14 सेकंद वेगवान असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

ड्रायव्हिंग आणि हँडलिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्या पिढीचे टायर्स देण्यात आले आहेत. मागील टायर्स आता 325/30 ZR 21 साइजमध्ये असून ते आधीपेक्षा 10 मिलिमीटर रुंद आहेत, तर समोरचे 255/35 ZR 20 साइज कायम आहेत. पॉर्शे सेरॅमिक कॉम्पोझिट ब्रेक (PCCB) सिस्टममध्ये नव्या ब्रेक पॅड्सचा समावेश आणि मागील रोटर्सचा व्यास 390 वरून 410 मिलिमीटर करण्यात आला असून यामुळे ब्रेकिंग आणखी प्रभावी झाली आहे.

इंटिरियरमध्ये कूपे व्हर्जन स्टँडर्ड दोन-सीटर स्वरूपात असून रिअर सीट्स ऑप्शनल आहेत आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च नाही. कॅब्रिओलेटमधील 2+2 सीट लेआउट कायम ठेवण्यात आला आहे. ऍडाप्टिव्ह 18-वे स्पोर्ट सीट्स प्लस, मेमरी फंक्शन, हेडरेस्टवर कोरलेले टर्बो एस बॅज आणि सीटसर्व्हिसवर दिलेली खास डिझाइन एलिमेंट्स इंटिरियरला आणखी प्रीमियम बनवतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande