
श्रीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या कार बॉम्ब स्फोटाचा मुख्य आरोपी दहशतवादी उमर नबी याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी उध्वस्त केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटानंतर सुरक्षा दलांनी कठोर पाऊल उचलले आहे. मुख्य आरोपी दहशतवादी डॉ. उमर नबी याचे पुलवामामधील घर पूर्णपणे पाडण्यात आले. दिल्लीतील स्फोटात वापरलेल्या स्फोटकांनी भरलेली कार चालवणारा डॉ. उमर नबी हा पुलवामा जिल्ह्यात राहत होता, आणि त्याचे घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गुरुवार-शुक्रवारच्या रात्री ही मोहीम राबवण्यात आली.
लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. स्फोटकांनी भरलेली हुंडई आय-20 ही कार उमर चालवत होता. स्फोटस्थळावरून गोळा केलेल्या डीएनए नमुन्यांची तुलना डॉ. उमरच्या आईच्या नमुन्यांशी केल्यानंतर त्याची ओळख निश्चित झाली. आपल्या परिसरात शैक्षणिकदृष्ट्या कुशल व्यावसायिक म्हणून ओळखला जाणारा उमर नबी गेल्या 2 वर्षांत दहशतवादी विचारांकडे झुकला होता, असेही चौकशीत समोर आले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी