
धुळे, 14 नोव्हेंबर (हिं.स.) सुयोग नगर परिसरातील एका व्यापार्याच्या घरी मध्यरात्री चोरट्यांनी धाड टाकून चार लाख रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाडी-भोकर रोडवरील प्लॉट क्रमांक १३ येथे राहणारे जय बालाजी नोवेल्टी प्लास्टिक आणि कोकरी दुकानाचे मालक राधेश्याम सोनगिरे यांनी ही तक्रार पश्चिम पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. घटनास्थळावरील माहितीनुसार, सोनगिरे हे रात्री दीडच्या सुमारास दुकान बंद करून घरी आले. त्यांनी सुयोग नगरात व्यापार्याचे घर ङ्गोडले रोख रक्कम कपाटात ठेवून झोप घेतली. मात्र पहाटे उठल्यानंतर कपाटातील चार लाख रुपये गायब असल्याचे त्यांनी पाहिले. ही रक्कम ते कर्ज फेडण्यासाठी ठेवून होते, अशी माहिती दिली आहे. तक्रार मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पथक, श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापयरत पंचनामा आणि गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांनी नेमका कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि चोरी कशी घडवून आणली, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर