सोलापूर - भक्तीसागरात 400 दिंड्या, 6 लाख भाविक दाखल
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यात्रा सोहळ्यासाठी आलेल्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे 668 जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गतवर्षी 497 प्ल
Wari 1 Solapur


सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यात्रा सोहळ्यासाठी आलेल्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे 668 जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गतवर्षी 497 प्लॉट होते. यावेळेस 171 प्लॉट्सची वाढ झाली आहे. याठिकाणी दशमी दिवशी सायंकाळपर्यंत 400 दिंड्या दाखल झाल्या होत्या. तर 300 प्लॉटचे वाटप करण्यात आले होते. एकूण 6 लाख भाविक दाखल झाले आहेत. आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

भक्तीसागर याठिकाणी मोफत प्लॉट्स, भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणार्‍या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांच्या सेवेसाठी येथे आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत याठिकाणी भाविकांना निवार्‍यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजविण्यासाठी गॅस वितरण, पोलिस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा याठिकाणी दिल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र आहे.थे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी तहसीलदार सचिन मुळीक हे सेक्टर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. भाविकांना प्लॉट्स वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे अधिनस्त कर्मचारी कार्यान्वित आहेत. दरम्यान,भक्तीसागर येथे दशमीला दाखल झालेल्या दिंड्यातील भाविकांनी तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करत आहेत. या तंबू, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन सुरू आहे. भक्तीसागरात भाविक दंग झाल्याचे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande