नांदेड-आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून लोहा - कंधारसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर
नांदेड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)लोहा कंधार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून 12 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले . आता या दोन्ही शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आ
नांदेड-आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून लोहा - कंधारसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर


नांदेड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)लोहा कंधार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून 12 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले . आता या दोन्ही शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात लोहा कंधार शहराचा चेहरा बदलेल असा विश्वास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाचा समतोल साधताना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा आणि कंधार नगरपालिकेच्या विकासासाठी ही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. लोहा , कंधार शहराच्या विविध विकासासाठी त्यांनी 12 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर आठच दिवसात पुन्हा या दोन्ही शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला आहे. निधी मंजुरीचे पत्र संबंधित विभागाने दिले आहे.

या दहा कोटी रुपयांच्या निधीतून कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ,स्मारक ,पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे . शांतीदूत स्वर्गीय गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान विकसित करणे, दर्गापुरा येथे सी सी रस्ता करणे , लोहा शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील उद्दान विकास करणे, बन्नाळा नाली बांधकाम आणि सी सी रस्ता करणे, देवानेवाडी येथे रस्ता करणे, मुक्ताई नगर , शिक्षक कॉलनी , सायाळ रोड नंदिकेश्वर परिसर रस्ता करणे ,पवार गल्ली , चव्हाण गल्ली , भाई गल्ली येथील सी सी रस्ता करणे यासह अनेक कामे करण्यात येणार आहेत.

यासर्व कामासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निधी मंजूर करून घेण्यासाठी सतत प्रयत्न केले होते. अखेर लोहा कंधार च्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून दोन्ही शहराच्या विकासासाठी मोठी मदत होईल असे मत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande