मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच खेळाडूचा मैदानावर मृत्यू
जळगाव, 6 डिसेंबर (हिं.स.) | शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या गवळी प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी क्रीडा क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना घडली. सातवा सामना संपल्यानंतर खंडवा संघाचा अष्टपैलू खेळाडू गणेश यादव (वय ४२, रा. खंडवा) यांचा मैदानावरच हृदयविक
मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच खेळाडूचा मैदानावर मृत्यू


जळगाव, 6 डिसेंबर (हिं.स.) | शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या गवळी प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी क्रीडा क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना घडली. सातवा सामना संपल्यानंतर खंडवा संघाचा अष्टपैलू खेळाडू गणेश यादव (वय ४२, रा. खंडवा) यांचा मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

त्यांच्या अचानक जाण्याने गवळी समाजात आणि क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.गणेश यादव यांनी सामन्यात धडाकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. अवघ्या १८ चेंडूत त्यांनी ४४ धावा फटकावत प्रेक्षकांची दाद मिळवली. याचबरोबर गोलंदाजीत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत त्यांनी अष्टपैलू कौशल्याची जोरदार छाप सोडली.सामना संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते मैदानाच्या मध्यभागी येत असतानाच त्यांना अचानक छातीमध्ये कळ आली आणि ते कोसळले.

उपस्थित खेळाडू व आयोजकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या धक्कादायक प्रसंगानंतर गवळी समाजासह परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. खेळाडूच्या आकस्मिक निधनामुळे आयोजकांनी तातडीने बैठक घेऊन गवळी प्रीमियर लीग स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयोजक समितीने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande