शिल्पा शेट्टी हिने घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर, 6 डिसेंबर, (हिं.स.)। बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज कोल्हापुरात येऊन करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले त्यांच्या सोबत भाजपचे नेते आ. प्रसाद लाड आणि त्यांच्या पत्नी यांनीदेखील देवीचे दर्शन घेतले. अभिनेत्री शिल्या शेट्टी
शिल्पा शेट्टी, आ. प्रसाद लाड श्री अंबाबाई दर्शन घेताना


कोल्हापूर, 6 डिसेंबर, (हिं.स.)।

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज कोल्हापुरात येऊन करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले त्यांच्या सोबत भाजपचे नेते आ. प्रसाद लाड आणि त्यांच्या पत्नी यांनीदेखील देवीचे दर्शन घेतले.

अभिनेत्री शिल्या शेट्टी श्री अंबाबाई मंदिरात आ. प्रसाद लाड आणि त्यांच्या पत्नी सोबत दर्शना साठी मंदिरात आल्या. त्यांचे भाजपचे राज्य कार्यकारीणी सदस्य महेश जाधव यांनी स्वागत केले. शिल्पा शेट्टी हिने देवीला ओटी अर्पण केली. मंदिरातील पुजाऱ्यांनी तीला फुले आणि प्रसाद दिला. शिल्पा शेट्टीचे आगमन हा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी सुखद धक्का होता. अनेकानी हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande