बांगलादेशात डेंग्युचा प्रकोप वाढला; २४ तासांत २०० रुग्णांची भर
ढाका, ६ डिसेंबर (हि.स.)। बांगलादेशमध्ये डेंग्यु रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील विविध रुग्णालयांमध्ये डेंग्युचे २०० नवे रुग्ण दाखल झाले आहेत. दिलासा म्हणजे, या कालावधीत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू
डेंग्यु


ढाका, ६ डिसेंबर (हि.स.)। बांगलादेशमध्ये डेंग्यु रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील विविध रुग्णालयांमध्ये डेंग्युचे २०० नवे रुग्ण दाखल झाले आहेत. दिलासा म्हणजे, या कालावधीत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

‘ढाका ट्रिब्यून’च्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत दाखल झालेल्या रुग्णांमध्ये—

बारीसाल विभाग (नगरपालिका क्षेत्राबाहेर) – 14 रुग्ण

चिटगाव विभाग (नगरपालिका क्षेत्राबाहेर) – 92 रुग्ण

ढाका विभाग (नगरपालिका क्षेत्राबाहेर) – 14 रुग्ण

ढाका उत्तर नगर निगम (DNCC) – 72 रुग्ण

ढाका दक्षिण नगर निगम (DSCC) – 6 रुग्ण

खुलना विभाग (नगरपालिका क्षेत्राबाहेर) – 2 रुग्ण यांचा समावेश आहे.

माहितीनुसार, मागील २४ तासांत डेंग्युमुळे एकही मृत्यू झालेला नाही. मात्र, या वर्षी आतापर्यंत ३९४ जणांचा मृत्यू डेंग्युमुळे झाला आहे. याचबरोबर ९६,८२७ नागरिकांना डेंग्युची लागण झाली असून, त्यापैकी ६३% पुरुष आणि ३७% महिला आहेत.

मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये डेंग्युचे १,०१,२१४ रुग्ण आढळले होते आणि या आजारामुळे ५७५ जणांचा बळी गेला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande