अमरावती - महापालिकेच्या कर वसुली शिबिरात 43.94 लाख जमा
अमरावती, 7 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेतर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात एकूण ४३.९४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. या वसुलीमध
महापालिकेच्या कर वसुली शिबिरात 43.94 लाख जमा:अमरावतीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आणखी शिबिरे होणार


अमरावती, 7 डिसेंबर (हिं.स.)।

अमरावती महानगरपालिकेतर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात एकूण ४३.९४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.

या वसुलीमध्ये उत्तर झोन क्रमांक १ मधून ८.५२ लाख रुपये, मध्य झोन क्रमांक २ मधून २०.३५ लाख रुपये, पूर्व झोन क्रमांक ३ मधून ४.८३ लाख रुपये, दक्षिण झोन क्रमांक ४ मधून १.३१ लाख रुपये तर पश्चिम झोन क्रमांक ५ मधून ८.९३ लाख रुपये जमा झाले.

प्रलंबित मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध प्रभागांमध्ये हे विशेष शिबीर आयोजित केले होते.

सकाळपासूनच करदात्यांची गर्दी दिसून आली. अनेकांनी ऑनलाइन तर काहींनी काउंटरद्वारे कर भरून महापालिकेच्या उपक्रमाला सहकार्य केले.

मालमत्ता कर संकलन वाढवण्यासाठी महानगरपालिका पुढील काही दिवसांत आणखी शिबिरे आयोजित करण्याचा विचार करत असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. तसेच, कर नियमित भरणाऱ्या नागरिकांचे आभारही व्यक्त करण्यात आले.

शहरातील विकासकामांसाठी मालमत्ता कर ही प्रमुख महसुलाची तरतूद असल्याने या वसुलीमुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीला दिलासा मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande