छ. संभाजीनगर - ईदगाह मैदान निधीतून संरक्षणभिंत बांधकाम व सुशोभीकरण
छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर, (हिं.स.)। ''सबका साथ सबका विकास'' या विचारातून फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील ईदगाह मैदान (३० लक्ष) निधीतून संरक्षणभिंत बांधकाम व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस
भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ


छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर, (हिं.स.)। 'सबका साथ सबका विकास' या विचारातून फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील ईदगाह मैदान (३० लक्ष) निधीतून संरक्षणभिंत बांधकाम व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेला सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांसाठीचा उत्तम जागा उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी जि.प.सदस्य श्री.जितेंद्र बाबा जैस्वाल, मंडळ अध्यक्ष श्री.गोपाल वाघ, सरपंच मनिषाताई जाधव, उपसरपंच ईफान पठाण यांच्यासह श्री.सुनिल तायडे, श्री.जगणं दाढे, श्री.रामेश्वर चोपडे, श्री.कैलास गायके, श्री.माधवराव जाधव, श्री.रवि पवार, भागुताई काकडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande