स्प्लिट कोचिंगच्या मागणीवर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले
विशाखापट्टणम, 7 डिसेंबर (हिं.स.)सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या स्प्लिट कोचिंगच्या चर्चेवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव झाल्यानंतर, काही क्
गौतम गंभीर


विशाखापट्टणम, 7 डिसेंबर (हिं.स.)सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या स्प्लिट कोचिंगच्या चर्चेवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव झाल्यानंतर, काही क्रिकेट तज्ञ आणि आयपीएल संघाच्या मालकाने कसोटी आणि वन-डे, टी-20 संघांसाठी वेगळे प्रशिक्षक असण्याचा सल्ला दिला. गंभीरने उत्तर देताना म्हटले की, अशी विधाने आश्चर्यकारक आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या मर्यादेत राहावे.

भारताने दक्षिण आफ्रिकेला २-१ ने पराभूत करत एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाला, पाहा, (कसोटी मालिकेत) निकाल आपल्या मनासारखे नसल्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोणत्याही माध्यमाने किंवा पत्रकाराने एकदाही लिहिले नाही की, आमचा पहिला कसोटी सामना (कोलकातामध्ये) कर्णधार (शुभमन गिल) शिवाय खेळला गेला, ज्याने दोन्ही डावात (मानेला दुखापतीमुळे) फलंदाजी केली नाही.

गंभीरने आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. ते म्हणाले की, अनेक लोकांनी अशा टिप्पण्या केल्या ज्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. गंभीर पुढे म्हणाले, आयपीएल संघाच्या मालकानेही स्प्लिट कोचिंगबद्दल लिहिले. हे खरोखर आश्चर्यकारक आहे. लोकांनी त्यांच्या मर्यादेत राहणे महत्वाचे आहे. जर आपण कोणाच्याही भूमिकेत हस्तक्षेप करत नसू तर त्यांनी आपल्यावर भाष्य करू नये.

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, पार्थ जिंदाल यांनी व्हाईट-बॉल आणि रेड-बॉल फॉरमॅटसाठी स्वतंत्र प्रशिक्षकांची मागणी केली. त्यांनी 'एक्स' वर लिहिले, घरच्या मैदानावर इतका भयानक पराभव... मला विश्वास बसत नाही! मी आमच्या कसोटी संघाला यापूर्वी कधीही इतके कमकुवत पाहिले नव्हते. जेव्हा रेड-बॉल स्पेशालिस्ट खेळाडू निवडले जात नाहीत तेव्हा असेच घडते. हा संघ कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याकडे असलेली खोली आणि ताकद प्रतिबिंबित करत नाही. बीसीसीआयने कसोटी क्रिकेटसाठी एक विशेषज्ञ रेड-बॉल प्रशिक्षक नियुक्त करण्याची वेळ आली आहे.

गंभीरने कसोटी संघात सुरू असलेल्या संक्रमणाचा काळ आणि गिलची अनुपस्थिती ही संघाच्या पराभवाची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी सबबी करत नाही. पण सत्य सांगणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही संक्रमण काळात असता आणि तुमचा कर्णधार, जो तुमचा मुख्य फलंदाज देखील असतो, तो उपलब्ध नसतो, तेव्हा निकालांवर परिणाम होणे स्वाभाविक असते. पण कोणीही त्याबद्दल बोलले नाही. खेळपट्ट्या आणि इतर मुद्द्यांबद्दलच्या चर्चा अनावश्यक असल्याचे त्यांनी फेटाळून लावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande