
पणजी, 7 डिसेंबर (हिं.स.)गोव्यातील प्रसिद्ध नाईट क्लब, बिर्च बाय रोमियो लेन येथे मोठी दुर्घटना घडली. शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. काही क्षणातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यातील काही लोकच बचावू शकले. आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये बहुतेक क्लब कर्मचारी होते. या दुर्देवी घटनेत २० जणांचा मृत्यू गुदमरून झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार नाईट क्लब सुरक्षा नियमांचे पालन करत होता. गेल्या वर्षीच हा नाईट क्लब सुरू झाला होता. त्यांनी क्लबच्या जबाबदार व्यवस्थापनावर आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्पोरा गावातील या नाईट क्लबमध्ये रात्री १ वाजताच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. बळी गेलेले लोक बिर्च बाय रोमियो लेनचे कर्मचारी होते. ५० जखमींना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार पर्यटक आणि १९ क्लब कर्मचारी आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मान्य केले की, क्लबमध्ये पुरेशा अग्निसुरक्षा उपाययोजनांचा अभाव होता. हा क्लब गोव्याची राजधानी पणजीपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे आणि रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. गोवा सरकार याची सखोल चौकशी करेल आणि दोषी आढळणाऱ्यांना अटक करेल. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या अगदी आधी लागलेल्या या आगीने संपूर्ण गोवा प्रदेश हादरून टाकला आहे.
भाजप आमदार मायकल लोबो यांनी उत्तर गोवा रेस्टॉरंट आगीबद्दल दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, मृतांपैकी बहुतेक जण रेस्टॉरंटच्या तळघरात काम करणारे स्थानिक होते. त्यांनी सांगितले की, या घटनेनंतर, गोव्यातील इतर सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट करणे आवश्यक आहे. पर्यटक नेहमीच गोव्याला एक अतिशय सुरक्षित ठिकाण मानतात, परंतु आगीची घटना खूप त्रासदायक आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत. पर्यटक आणि या ठिकाणी काम करणाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री १२:०४ वाजता अर्पोरा येथील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचा फोन आला. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. एकूण २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलीस घटनेचे कारण तपासतील आणि त्यांच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई करतील.
गोवा पोलिस प्रमुख आलोक कुमार यांनी सांगितले की, हा सिलेंडरचा स्फोट होता. भाजप आमदार मायकल लोबो यांनी सांगितले की, अग्निशमन अधिकाऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले. त्यांनी गोव्यातील सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट करण्याची आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावले उचलण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे