गेवराईत पवार-पंडित गटात झालेल्या राडाप्रकरणी १७ जणांना अटक व सुटका
बीड, 7 डिसेंबर (हिं.स.)। गेवराई नगर पालिका मतदानाच्या दिवशी गेवराईत पवार- पंडित गटात झालेल्या राडाप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी भाजप नेते बाळराजे पवार, त्यांचे पुत्र शिवराज पवार या दोघांसह एकूण १७ जणांना अटक केली. सर्वांना नोटीस देऊन स
गेवराईत पवार-पंडित गटात झालेल्या राडाप्रकरणी १७ जणांना अटक व सुटका


बीड, 7 डिसेंबर (हिं.स.)।

गेवराई नगर पालिका मतदानाच्या दिवशी गेवराईत पवार- पंडित गटात झालेल्या राडाप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी भाजप नेते बाळराजे पवार, त्यांचे पुत्र शिवराज पवार या दोघांसह एकूण १७ जणांना अटक केली. सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले. सोमवारी या सर्वांना अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सर्वांकडून मोठ्या रकमेचे बंधपत्र लिहून घेतले जाणार आहे.

पुन्हा गुन्हा केल्यास हे बंधपत्र रद्द होऊन त्या रकमेचा दंड होईल असे सांगण्यात आले.

गेवराई शहरात नगर पालिका मतदानादरम्यान मतदान केंद्र क्रमांक १० वर पृथ्वीराज पंडित व शिवराज पवार यांच्यात झालेल्या राड्याचे रुपांतर मोठ्या प्रकरणात झाले.या राड्यानंतर बाळराजे पवार आपल्या सहकाऱ्यांसह थेट माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या कृष्णाई निवास्थानी धडकले होते.

तिथे त्यांनी पंडितांचे पीए अमृत डावकर यांना मारहाण झाली होती. यानंतर जयसिंह पंडित व पृथ्वीराज पंडित हे आपल्या कार्यकर्त्यांसह बाळराजे पवार यांच्या घरावर धावून गेले होते असा आरोप आहे.तिथे माजी आ. लक्ष्मण पवार व जयसिंह पंडित एकमेकांवर धावून गेले. कार्यकर्त्यांनी दगडफेक करुनजीप फोडली होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, या प्रकरणात दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रार दिली गेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी स्युमोटो दखल घेऊन दोन्ही गटांकडील सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande