गोवा दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक, आर्थिक मदत जाहीर
नवी दिल्ली, ७ डिसेंबर (हिं.स.) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून मोदींनी घोषणा केल
गोवा दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त


नवी दिल्ली, ७ डिसेंबर (हिं.स.) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून मोदींनी घोषणा केली की, गोव्यातील अर्पोरा येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये मदत दिली जाईल. तर जखमींना ५०,००० रुपये मिळतील.

पंतप्रधानांनी एक्स-वर लिहिले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, उत्तर गोवा जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये अनेक मौल्यवान जीव गेले. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना. या कठीण काळात त्यांना धैर्य मिळो. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करते.

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आग लागल्याने ही घटना घडली. या दुर्घटनेत २5 जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकल लोबो घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अपघातावर दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, गोव्यासारख्या पर्यटन राज्यासाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार या घटनेची चौकशी करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande