39वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पूर्ण
पूर्ण पुरुष विजेता - टेरेफे हैमानोत (इथोपिया), पूर्ण मॅरेथॉन महिला विजेती साक्षी जडियाला पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। 39व्या पुणे अंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये रविवार दि.7डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या पूर्ण मेरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात इथोपियाचा टेरेफे
marat


पूर्ण पुरुष विजेता - टेरेफे हैमानोत (इथोपिया), पूर्ण मॅरेथॉन महिला विजेती साक्षी जडियाला

पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)।

39व्या पुणे अंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये रविवार दि.7डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या पूर्ण मेरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात इथोपियाचा टेरेफे हैमानोत (2तास20मिनिटे08सेकंद) आणि पूर्ण मेरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडियाला (2तास39मिनिटे37सेकंद ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.42. 195किमीच्या पूर्ण मेरेथॉन पुरुष गटात द्वितीय क्रमांक इथोपियच्या मिको देरेजे अलेनू (2तास20मिनिटे09सेकंद) आणि तृतीया क्रमांक भारताच्या त्रिथा पुन (2तास20मिनटे17सेकंद) यांनी मिळवला.

पूर्ण मेरेथॉन महिला गटात द्वितीय क्रमांक इथोपियाच्या इडो टूलो (2तास40मिनटे56सेकेंद) आणि तृतीय क्रमांक इथोपियाची वारे डेमिसी (2तास50मिनटे46सेकेंद) यांनी मिळवला.

अर्ध मेरेथॉनमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक भारताच्या सचिन यादव (1तास3मिनिटे43सेकेंद),द्वितीय क्रमांक भारताच्या राज तिवारी (1तास3मिनिटे44सेकंद) आणि तृतीय क्रमांक भारताच्या मुकेश कुमार (1तास4मिनटे3सेकंद) यांनी मिळवला

.

मिहालांच्या अर्ध मेरेथॉनमध्ये भारताच्या भारती (1तास13मिनटे59सेकंद),द्वितीय क्रमांक भारताची रविणा गायकवाड (1तास15मिनटे58सेकंद) आणि यांनी मिळवला.

याशिवाय10किमी, 5किमी आणि व्हीलचेअर स्पर्धाही उत्सहात पार पडली.

पहाटे3वाजता ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते फ्लेग ऑफ करून स्पर्धेचा प्रारंभ सणस मैदान जवळील हॉटेल कल्पना - विश्व चौकातून झाला. सर्व गटातील सर्व स्पर्धक परंतल्यानंतर सणस मैदान येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,पोलीस सहआयुक्त रंजनकुमार,अरविंद शिंदे,बाळासाहेब शिवरकर,विशाल चोरडिया, दीप्ती चवधरी,कमल व्यवहारे,आबा बागुल,प्रशांत जगताप, संजय मोरे, सुनील शिंदे, लता राजगुरू,डॉ. सतीश देसाई,संगीता तिवारी,डॉ. राजेंद्र जगताप,सचिन आडेकर,यासिन शेख,अक्षय जैन,रेस डायरेक्टर सुमंत वायकर,जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे व गुरुबंस कौर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande