आयएसएसएफ विश्वचषक फायनल्स : सुरुची सिंगला सुवर्णपदक; मनु भाकर पदक मिळविण्यापासून वंचित
नवी दिल्ली, 7 डिसेंबर (हिं.स.)प्रतिभावान नेमबाज सुरुची सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तर तिची सहकारी संयमने रौप्यपदक जिंकले. ज्यामुळे हंगाम संपणाऱ्या आयएसएसएफ विश्वचषक अंतिम फेरीच्या पहिल
मनू भाकर


नवी दिल्ली, 7 डिसेंबर (हिं.स.)प्रतिभावान नेमबाज सुरुची सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तर तिची सहकारी संयमने रौप्यपदक जिंकले. ज्यामुळे हंगाम संपणाऱ्या आयएसएसएफ विश्वचषक अंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी भारताला चांगली सुरुवात मिळाली. पण दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनु भाकर निराश झाली आणि पदक मिळविण्यापासून वंचित राहिली.

१० मीटर रायफल नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर सुरुचीने अंतिम फेरीत २४५.१ च्या शानदार गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तर माजी ज्युनियर विश्वविजेत्या संयमने २४३.३ गुणांसह देशासाठी रौप्यपदक मिळवले. मनु भाकर अंतिम फेरीत पोहोचली पण १७९.२ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. या वर्षाच्या सुरुवातीला सलग चार विश्वचषक सुवर्णपदके जिंकल्यानंतर, सुरुची सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जगात अव्वल स्थानावर होती. ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. पात्रता फेरीत १२ नेमबाजांच्या एलिट गटात एकूण ५८६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले.

मनू भाकर (५७८) सहाव्या स्थानावर राहिली, तर २०२३ ची ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन संयम (५७३) पात्रता फेरीत आठव्या स्थानावर राहिल्यानंतर केवळ अंतिम फेरीत पोहोचू शकली. पण २१ वर्षीय नेमबाजपटूने संयम अंतिम फेरीत पूर्णपणे वेगळी दिसत होती. तिने बहुतेक अंतिम फेरीत आघाडी घेतली. पण एलिमिनेशन फेरीत चार वेळा ९.५ गुण मिळवून सुरुचीकडून अव्वल स्थान गमावले.

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत माजी भारतीय वर्ल्ड चॅम्पियन रुद्राक्ष पाटील आणि पॅरिस ऑलिंपिक फायनलिस्ट अर्जुन बाबुता अनुक्रमे चौथ्या आणि सहावे स्थानावर राहिले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत एलावेनिल वलारिवन देखील अपयशी ठरली. पात्रता फेरीत ती नवव्या स्थानावर राहिली आणि आठ नेमबाजांच्या फायनलसाठी पात्र ठरू शकली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande