
ठाणे, 7 डिसेंबर, (हिं.स.)।
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून सुस्वानंद कला प्रतिष्ठान या संस्थेच्या डोंगरार्त या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर या संस्थेच्या ओय ले ले या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे ठाणे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
प्रजाहित प्रतिष्ठान या संस्थेच्या थर्टी-सिक्स्टी नाइंटी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक मीनल दातार (नाटक- डोंगरार्त), द्वितीय पारितोषिक कमलाकर लोखंडे (नाटक-थर्टी-सिस्क्टी-नाइंटी), तृतीय पारितोषिक विशाल तांबे (नाटक ओय ले ले) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-नारायणी), द्वितीय पारितोषिक अजय अणसूरकर (नाटक-थर्टी-सिस्क्टी-नाइंटी), तृतीय पारितोषिक सिध्देश नांदलस्कर (नाटक- इतना सन्नाटा क्यूँ है भाई ?) नेपथ्य : प्रथम पारितोषिक साई अडागळे (नाटक-थर्टी-सिस्क्टी-नाइंटी), द्वितीय पारितोषिक सिध्देश नांदलस्कार (नाटक-इतना सन्नाटा क्यूँ है भाई?) तृतीय पारितोषिक किर्तिनिया देशमुख, (नाटक-नारायणी) रंगभूषा : प्रथम पारितोषिक अभय शिंदे (नाटक-डोंगरार्त), द्वितीय पारितोषिक रितुपर्णा कीर्तोनिया (नाटक-नारायणी) तृतीय पारितोषिक उदयराज तांगडी (नाटक--इतना सन्नाटा क्यूँ है भाई ?) संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक मंदार देशपांडे (नाटक-डोंगरार्त), द्वितीय पारितोषिक प्राविण्य वस्निक (नाटक- नारायणी) तृतीय पारितोषिक नितीन चौगुले (नाटक-थर्टी-सिस्क्टी-नाइंटी) वेशभूषाः प्रथम पारितोषिक शिल्पा दिक्षीत (नाटक-डोंगरार्त), द्वितीय पारितोषिक रितुपर्णा कीर्तोनिया (नाटक-नारायणी) तृतीय पारितोषिक हिमालय चोरघे (नाटक-कर मर कर हौस) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक धनंजय कुलकर्णी (नाटक-ओय ले ले) व चैताली राजे (नाटक- डोंगरार्त), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रतिक पानकर (नाटक-तिसरी घंटा), सचिन शिंदे (नाटक- डाळ मे कुछ काळा है), दिपेश सावंत (नाटक ओय ले ले), यतीन सावंत (नाटक--थर्टी-सिस्क्टी-नाइंटी), क्षितीज गायकवाड (नाटक- नारायणी), आरती पाठक (नाटक कर मर कर हौस), सानिका पाटील (नाटक-नारायणी), शिल्पा दिक्षीत (नाटक-डोंगरार्त) रमा अमीन (डोंगरार्त), मिताली ताम्हाणे (ऑक्सीजन)
दि. १० नोव्हेंबर, २०२५ ते ०२ डिसेंबर, २०२५ या कालावधीत डॉ. काशिनाथ घाणेकर (मिनी) नाट्यगृह, ठाणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. ठाणे केंद्रासाठी प्रफुल्ल गायकवाड ह्यांची केंद्र समन्वयक म्हणुन नेमणूक करण्यात आली होती. ठाणे केंद्रातील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संजय कुलकर्णी, डॉ. समीर मोने आणि श्रीमती अनुया बाम यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर