कोल्हापुरातील माजी महापौर सई खराडेसह तिघांचा शिवसेना पक्षात प्रवेश
कोल्हापूर, 7 डिसेंबर, (हिं.स.)। कोल्हापूर महानगर पालिकेचा आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शहरातील महत्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व शिवसेना शिंदे गटाने मिळवले आहे. कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे यांनी आपले पुत्र शिववेज खराडे यांचेसह
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खराडे, अडगुळे यांचा पक्ष प्रवेश


कोल्हापूर, 7 डिसेंबर, (हिं.स.)।

कोल्हापूर महानगर पालिकेचा आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शहरातील महत्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व शिवसेना शिंदे गटाने मिळवले आहे.

कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे यांनी आपले पुत्र शिववेज खराडे यांचेसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याबरोबच माजी महापौर आणि काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महादेवराव अडगुळे यांचे सुपुत्र इंद्रजित अडगुळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा सोहळा पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडला.

यावेळी कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर, हातकणंगलेचे माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.

कोल्हापूरतील शिवाजी पेठेचा आणि बोंद्रे, खराडे घराण्याचा शहरावर कायम दबदबा राहीला आहे. याच परिसरातून सई खराडे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवकपद, आणि तब्बल अडीच वर्षे महापौर पद भुषवले आहे.

माजी कृषी मंत्री दिवंगत श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी, कृषिभूषण कै. महिपतराव उर्फ पापा बेंद्रे यांच्या कन्या असणाऱ्या सर्ई खराडे या माजी नगराध्यक्ष कै. सखारामबापू खराडे यांच्या स्नुषा आहेत. त्यांचे पती आजित खराडे कॉग्रेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणावर महत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. यापूर्वी शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसचे शारंगधर देशमुख, भाजप - ताराराणी आघाडीयचे सत्यजित कदम, हे महत्वाचे शिलेदार घेतले आहेत. सई खराडे यांच्या प्रवेशानंतर शिंदे गटाचे स्थान कोल्हापूरमध्ये अधिक बळकट होईल, पालकमंत्री, प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर, आ चंद्रदिप नरके या नेत्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande