वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी संसदेत चर्चा
नवी दिल्ली , 7 डिसेंबर (हिं.स.)।संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ८ डिसेंबर रोजी संसदेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान राष्ट्रीय गीताशी संबंधित अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक तथ्ये
वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी संसदेत होणार चर्चा


नवी दिल्ली , 7 डिसेंबर (हिं.स.)।संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ८ डिसेंबर रोजी संसदेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान राष्ट्रीय गीताशी संबंधित अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक तथ्ये सभागृहात मांडली जाणार आहेत, ज्यांची माहिती फार थोड्या लोकांना आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत या चर्चेची सुरुवात करतील. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अंतिम भाषण देत चर्चेचा समारोप करतील. राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे. संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे आठ नेतेही आपली मते मांडतील. या यादीत लोकसभेतील उपनेते (प्रतिपक्ष) गौरव गोगोई, प्रियंका वाड्रा, दिपेंद्र हुड्डा, बिमोल अकोइजाम, प्रणीती शिंदे, प्रशांत पडोले, चमाला रेड्डी आणि ज्योत्स्ना महंत यांची नावे आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून ते १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय गीत वंदे मातरमची १५० वी वर्षगाठ साजरी करण्यात आली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले वंदे मातरम प्रथम ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंगदर्शन या साहित्यिक मासिकात प्रकाशित झाले. १८८२ मध्ये हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग बनले. रवींद्रनाथ ठाकूर यांनी या गीताला संगीत दिले आणि स्वातंत्र्यलढ्यात हे गीत स्वातंत्र्यसैनिकांचे घोषणा बनले. २४ जानेवारी १९५० रोजी भारत सरकारने वंदे मातरमला राष्ट्रीय गीतेचा दर्जा प्रदान केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande