एअरटेल - गूगल भारतात सुरू करणार आरसीएस मैसेजिंग सेवा
मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात एक मोठा बदल घडत आहे. एअरटेलने जगातील तंत्रज्ञान दिग्गज गूगलसोबत भागीदारी केली आहे आणि आता भारतात आरसीएस (रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस) मेसेजिंग सुरू होणार आहे. आरसीएस हा पारंपरिक एसएमएस पेक्षा खू
Airtel  Google


मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात एक मोठा बदल घडत आहे. एअरटेलने जगातील तंत्रज्ञान दिग्गज गूगलसोबत भागीदारी केली आहे आणि आता भारतात आरसीएस (रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस) मेसेजिंग सुरू होणार आहे. आरसीएस हा पारंपरिक एसएमएस पेक्षा खूप पुढारलेला मेसेजिंग अनुभव देतो.

आरसीएसचे वैशिष्ट्ये हे पारंपरिक एसएमएस पेक्षा खूप वेगळे आहेत. यामध्ये उच्च गुणवत्तेची फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतील, टायपिंग इंडिकेटर दिसेल, म्हणजे समोरचा व्यक्ती टाइप करत असल्याचे समजेल, तसेच रीड रिसीप्ट्स यामुळे मेसेज वाचला की नाही हे कळेल. ग्रुप चॅटही अधिक इंटरऐक्टिव्ह आणि सोपी होणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप सारखा अनुभव नेटवर्कवर आधारित न राहता मिळेल.आर्थिक बाजू पाहता, आरसीएस मेसेजिंगवर प्रति मेसेज फक्त रु 0.11 इतका मामूली खर्च येईल. भारतात आरसीएस मधील 80:20 रेव्हेन्यू-शेअर मॉडेल आहे, ज्यात जास्तीत जास्त कमाई एअरटेलकडे जाईल आणि उर्वरित गूगल कडे.

पूर्वी एअरटेल आरसीएस सुरू करण्यात हिचकिचत होती कारण एन्क्रिप्शन आणि स्पॅमबाबत काळजी होती. आता गूगलसोबत झालेल्या करारानुसार, आरसीएसला एअरटेलच्या स्मार्ट स्पॅम-फिल्टरशी लिंक केले जाईल, ज्यामुळे फक्त वैध मेसेज वापरकर्त्यांपर्यंत पोहचतील.

देशातील मोठ्या कंपन्या जसे की रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया देखील लवकरच आरसीएस सेवा सुरू करणार आहेत. यामुळे भविष्यामध्ये एसएमएस पेक्षा आरसीएस मेसेजिंगचा वापर वाढेल. व्यवसायिक दृष्टिकोनातूनही हे फायदेशीर ठरेल, कारण आरसीएस द्वारे इंटरेक्टिव्ह नोटिफिकेशन आणि ट्रांजॅक्शन मेसेज पाठवता येतील, ज्याचा फायदा मार्केटिंग, ई-कॉमर्स आणि बँकिंग क्षेत्रात होईल.

आरसीएस मेसेजिंगमध्ये एसएमएस पेक्षा अनेक सुविधा आहेत – अमर्यादित मेसेज लांबी, उच्च गुणवत्ता फोटो/व्हिडिओ, रीड रिसीट, टायपिंग इंडिकेटर, स्टिकर्स/इमोजी, कॉल बटण, लोकेशन शेअर. ही सेवा जवळपास सर्व अँड्रॉइड फोन आणि आयओएस 18+ फोन मध्ये वापरता येईल, तर एसएमएस सर्व फोनमध्ये उपलब्ध आहे, पण त्यात मर्यादित सुविधा आहेत. यानंतर भारतात वापरकर्त्यांसाठी संदेश पाठवण्याचा अनुभव अधिक स्मार्ट, वेगवान आणि इंटरऐक्टिव होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande