
बीड, 9 डिसेंबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी आज मंगळवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एक निवेदन सादर केले त्या निवेदनावर तात्काळ दखल घेत जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांना आवश्यक ते निर्णय तातडीने घेण्यासाठी सूचित केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार सुरेश धस म्हणाले की, गेल्या काही दिवसांत फार्मर आयडी संदर्भात जिल्ह्यातील अनेक शेतकरी अडचणीत आहेत. प्रारंभी प्रायोगिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या फार्मर आयडीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्या असून, अनेक शेतकऱ्यांची क्षेत्रे चुकीची नोंदवली गेली आहेत. काही अल्पभूधारक शेतकरी चुकीच्या क्षेत्रामुळे बहुभूधारक ठरले असून त्यामुळे ते अनेक कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. यासंबंधी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रश्नासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे कडे निवेदन सादर केले होते. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडीमध्ये दुरुस्तीची संधी देण्यात यावी अशी विनंती केली होती.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis