डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या दुःखद निधनाची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनु
डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार


पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या दुःखद निधनाची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, मजूर चळवळ आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी निस्वार्थी कार्य केले. त्यांच्या स्मृतीस शासकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतल्याने अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया प्रशासकीय देखरेखीखाली सुसूत्र पद्धतीने पार पाडली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande