
अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.)
क्राईम ब्रांचने रविवारला ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोघांना हायवेवरून अटक केली होती. या आरोपींकडून एकूण ६९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिस तपास सुरू होताच, ड्रग्ज तस्करांची टोळीच शहरातून पळून गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, क्राईम ब्रांचचेपोलिस निरीक्षक संदीप चौहान यांच्या नेतृत्वाखाली, शोध मोहीम सुरू केली आहे. फरार आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.रविवार, ७ डिसेंबर रोजी दुपारी क्राईम ब्रांचने राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार मो. सोफियान मो. मन्नान (२४) आणि शोएब खान समीर जाम (२४) यांना अटक केली होती. झडती दरम्यान त्यांच्याकडून अंदाजे ६,८२,००० रुपये किंमतीचे ६९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.कठोर चौकशी केल्यानंतर, दोन्ही आरोपींनी शहरातील अनेक ड्रग्जतस्करांची नावे उघडकेली. पोलिसांनी अटकेतील दोन आरोपींसह एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी सैय्यद अल्तमश सैय्यद गफ्फार, गोलू कबीर, आवेज कुरेशी आरिफ कुरेशी, साकिब कुरेशी उर्फ हग्या, आकीब कुरेशी, शेख नईम उर्फ राजा/होंगा, शेख नाजिम शेख रहीम उर्फ होंगा और शेख सोनू शेख रहीम यांचा समावेश आहे. सोमवारी, पोलिसांनी या फरार आरोपींचा शोध सुरू केला असता ड्रग्ज तस्करी करणारी टोळी शहरातून पळून गेली आहे. परिणामी, गुन्हे शाखेने आता सर्व फरार आरोपींविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे, त्यांचा ठावठिकाणा तपासला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना सोमवार, ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी