
लातूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या व चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती. या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानीय गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास पद्धती वापरून घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा कुख्यात व सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्ऱकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशावरून ,अपर पोलीस अधीक्षक, मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने ही महत्वाची कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लातूर–बार्शी रोडवरील लातूर विमानतळ टी-पॉइंट येथे चार संशयित इसम दोन मोटारसायकलीसह थांबलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सापळा लावून खालील संशयितांना दुपारी 2 वाजता ताब्यात घेण्यात आले. यावेळी अजय श्रावण शिंदे, अर्जुन दिलीप भोसले, केशव माणिक पवार आणि
विक्की सजगुऱ्या शिंदे यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 2 दुचाकी वाहने आणि मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच पोलिस चौकशीत आरोपींनी 23 घरफोडीच्या घटनांचा खुलासा केला. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 18 आणि इतर ठिकाणय्या 5 गुन्ह्यांचा समावेश आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis