एमजी मोटरने एमजी हेक्टर फेसलिफ्टचा अधिकृत टीझर केला जारी
मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने 2026 एमजी हेक्टर फेसलिफ्टसाठी आपला पहिला अधिकृत टीजर जारी केला आहे. ही एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारात येणार असून, यात काही कॉस्मेटिक अपडेट्स केले जाणार आहेत. एमजी हेक्टर ही कंपनीची भारतातील
MG Hector facelift


मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने 2026 एमजी हेक्टर फेसलिफ्टसाठी आपला पहिला अधिकृत टीजर जारी केला आहे. ही एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारात येणार असून, यात काही कॉस्मेटिक अपडेट्स केले जाणार आहेत.

एमजी हेक्टर ही कंपनीची भारतातील पहिली एसयूव्ही होती आणि आता ती अधिक प्रीमियम लूकसह बाजारात येणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपसह भागीदारीनंतर या एसयूव्हीचा पहिला मोठा अपडेट ठरणार आहे.फेसलिफ्ट हेक्टरमध्ये बदललेला एक्सटीरियर डिझाईन, अपडेटेड बंपर, फ्रंट फेसिया आणि ग्रिल दिसणार आहेत. सिग्नेचर LED सेटअप कायम राहणार आहे. 2026 मॉडेलमध्ये 19-इंचचे नवीन अलॉय व्हील्स असतील.

इंटीरियरमध्ये वेंटिलेटेड रियर सीट्स, अपडेटेड यूज़र इंटरफेस, पॅनोरामिक सनरूफ, डिजिटल क्लस्टर, एम्बिएंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग, पावर्ड ड्रायव्हर सीट आणि एअर प्युरिफायर यासारखी फीचर्स राहतील. कनेक्टेड टेक सूट आणि ADAS फंक्शन्ससह अपडेट केले जाण्याची शक्यता आहे.

पावरट्रेनमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल (141 bhp, 250 Nm) आणि 2.0-लीटर टर्बो डिझेल (167 bhp, 350 Nm) यांचे ऑप्शन राहतील. पेट्रोलसाठी 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT आणि डिझेलसाठी 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स उपलब्ध असण्याची शक्यता आहे. एमजी हेक्टर 2026 फेसलिफ्टने एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली प्रीमियम उपस्थिती पुन्हा स्थापित करण्याचा उद्देश ठेवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande