इंडिगो संकट : नियमांमुळे सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये – पंतप्रधान
नवी दिल्ली, 09 डिसेंबर (हिं.स.) : इंडिगो एअरलाईन्सच्या अलीकडील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की नियम-कायदे बनवण्यामागील उद्देश केवळ यंत्रणा अधिक सक्षम करणे हा असावा, सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्रास
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


नवी दिल्ली, 09 डिसेंबर (हिं.स.) : इंडिगो एअरलाईन्सच्या अलीकडील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की नियम-कायदे बनवण्यामागील उद्देश केवळ यंत्रणा अधिक सक्षम करणे हा असावा, सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्रास देणे नव्हे. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत माहिती दिली.

पंतप्रधानांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा इंडिगोच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड व उड्डाणातील विलंबाच्या बातम्या समोर येत आहेत. प्रवाशांना विमानतळावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे आणि अनेक उड्डाणे रद्दही होत आहेत. किरण रिजिजू यांच्या मते, बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले की आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की बनणारे नियम प्रशासन अधिक सक्षम करतील, लोकांचे दैनंदिन जीवन सुलभ करतील — त्यांना अडचणीत टाकणार नाहीत. कोणतीही धोरणे किंवा नियम थेट सर्वसामान्यांवर परिणाम करतात, म्हणून त्यामध्ये संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रिजिजू यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी इंडिगोच्या सध्याच्या संकटाचा उल्लेख करून अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. प्रवाशांच्या गैरसोयी कमी करणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande