भारतातून तांदळाच्या आयातीवर निर्बंध कडक करण्याचे ट्रम्प यांचे संकेत
नवी दिल्ली , 9 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की त्यांचे प्रशासन परदेशी कृषी उत्पादने, ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश आहे. यांच्यावर नवीन टॅरिफ लावण्याचा विचार करू शकते. व्हाईट हाऊसमध्
ट्रम्प यांची यूक्रेन शांती चर्चेतून माघार घेण्याची शक्यता


नवी दिल्ली , 9 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की त्यांचे प्रशासन परदेशी कृषी उत्पादने, ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश आहे. यांच्यावर नवीन टॅरिफ लावण्याचा विचार करू शकते. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित बैठकीत त्यांनी हे विधान केले, जिथे शेतकऱ्यांनी स्वस्त परदेशी मालामुळे अमेरिकन बाजारावर होणाऱ्या परिणामांची तक्रार मांडली. ही बैठक अमेरिकी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 12 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजचा एक भाग होती.

बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी आरोप केला की काही देश अमेरिकन बाजारात अतिशय कमी किमतीत तांदूळ विकत आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर ट्रम्प म्हणाले, “ते चीटिंग करत आहेत.” त्यांनी संकेत दिले की या आरोपांची चौकशी केली जाईल आणि गरज भासल्यास टॅरिफ लावले जातील.

लुईझियानाच्या ‘केनेडी राइस मिल’च्या सीईओ मेरिल केनेडी यांनी दावा केला की भारत, थायलंड आणि चीन हे या कथित डम्पिंगचे प्रमुख देश आहेत. त्यांनी सांगितले की चीन विशेषतः प्यूर्टो रिकोमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ पाठवत आहे, जिथे आता अमेरिकन तांदळाचा पुरवठा जवळजवळ बंद झाला आहे. केनेडी म्हणाल्या, “आम्ही अनेक वर्षांपासून तिथे तांदूळ पाठवलेलाच नाही. दक्षिणेकडील राज्यांतील शेतकरी फारच त्रस्त आहेत.”मेरिल केनेडी यांनी बैठकमध्ये सांगितले की टॅरिफ प्रभावी ठरत आहेत, परंतु त्यांना आणखी कठोर करण्याची गरज आहे. यावर ट्रम्प आश्चर्यचकित होत म्हणाले, “तुम्हाला अजून हवे आहे?” पण त्यांनी मान्य केले की जर एखादा देश डम्पिंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांना निर्देश दिले की शेतकऱ्यांनी सांगितलेल्या देशांची सूची तयार करावी. जेव्हा शेतकरी भारतीय अनुदान धोरणाबद्दल सांगू लागले तेव्हा ट्रम्प यांनी मध्येच थांबवत विचारले, “मला आधी देशांची नावे सांगा… इंडिया, आणि कोण?” बेसेंट यांनी भारत, थायलंड आणि चीन हे मुख्य स्रोत असल्याचे सांगितले आणि यादीत आणखी देश असू शकतात, ज्याची सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असेही नमूद केले. ट्रम्प यांनी आश्वासन दिले की या प्रकरणावर “लवकरच पावले उचलली जातील.”

चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी संकेत दिले की कॅनडातून येणाऱ्या खतांवरही मोठा शुल्क लावला जाऊ शकतो, जेणेकरून देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. अहवालानुसार भारत आणि कॅनडा दोन्ही देश अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अलीकडच्या महिन्यांत चर्चा फारशी पुढे गेलेली नाही. ऑगस्टमध्ये ट्रम्प प्रशासनाने भारतीय उत्पादनांवर 50 टक्के टॅरिफ लावले होते, असे म्हणत की भारत अमेरिकन बाजारावर अडथळे उभे करत आहे आणि रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवत आहे.

अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयाचे उपप्रमुख रिक स्विट्झर यांच्या नेतृत्वाखाली एक वरिष्ठ अमेरिकी प्रतिनिधिमंडळ याच आठवड्यात भारतासोबत व्यापार चर्चा पुन्हा सुरू करणार आहे. दोन्ही देश 10 आणि 11 डिसेंबरला अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील आणि द्विपक्षीय व्यापार करार पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. भारताच्या वतीने चर्चेचे नेतृत्व वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल करणार आहेत. त्यांनी सांगितले की भारत वर्षाच्या अखेरीस कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहे. 28 नोव्हेंबर रोजी एफआयसीसीआय च्या वार्षिक बैठकीत अग्रवाल म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की आपण हा करार या कॅलेंडर वर्षात पूर्ण करू.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande