सोलापूर - जिल्हाधिका-यांच्या हस्ते दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। गंगा कदम या दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20विश्वचषक (ब्लाइंड) स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली असून,भारताने हा ऐतिहासिक विश्वचषक जिंकला आहे. त
gana


सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। गंगा कदम या दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20विश्वचषक (ब्लाइंड) स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली असून,भारताने हा ऐतिहासिक विश्वचषक जिंकला आहे. त्यानिमित्ताने गंगा कदम यांचा सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या सह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

दृष्टीहीन क्रिकेट खेळाडू गंगा कदम यांचे मूळ गाव सोलापूर असून त्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबात सात बहिणी आणि एक भाऊ आहेत. त्यांचे वडील त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत. त्या सध्या दादर येथील कीर्ती कॉलेज मध्ये मास्टर्स इन सोशल वर्क (MSW)चे शिक्षण घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande