ट्रम्प यांच्या टॅरिफ शुल्काला कॅनडाचे सडेतोड प्रत्युत्तर
ओटावा, 2 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेने कॅनडामधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर आता कॅनडाचे कार्यवाहक पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारपासून( ४ फेब्रुवारी )कॅनडा १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवर २५ टक्के कर लादणा
Trump and tudo


ओटावा, 2 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेने कॅनडामधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर आता कॅनडाचे कार्यवाहक पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारपासून( ४ फेब्रुवारी )कॅनडा १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवर २५ टक्के कर लादणार असल्याची घोषणाही केली आहे.

जस्टिन ट्रूडो यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की त्यांचा देश अमेरिकन शुल्कांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. जस्टिन ट्रूडो म्हणाले की त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेतली आहे आणि लवकरच या संदर्भात मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांच्याशी चर्चा करणार आहेत.पुढे टुडो म्हणाले की, आम्हाला हे सर्व नको होते, पण आता कॅनडा तयार आहे.

ट्रम्प यांनी शनिवारी चीनमधून होणाऱ्या सर्व आयातीवर १० टक्के आणि मेक्सिको आणि कॅनडामधून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. तथापि, अमेरिकन सरकारच्या नवीन आदेशानुसार, आता कॅनडामधून तेल आणि वीज यासह ऊर्जा आयातीवर २५ टक्क्यांऐवजी फक्त १० टक्के शुल्क आकारले जाईल. या आदेशातील एका कलमात असेही म्हटले आहे की जर या तीन देशांमधील कोणीही या शुल्काच्या बदल्यात कोणतीही कारवाई केली तर अमेरिकन शुल्क वाढवले ​​जाईल.

एका वृत्तानुसार, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी सांगितले की, त्यांचा देश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काला जप्त करून प्रत्युत्तर देईल. त्याच वेळी, चीननेही अशाच प्रकारच्या प्रत्युत्तरात्मक उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकन सरकारच्या कृतीचा निषेध केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande