जळगाव : भरधाव कारने पाच जणांना उडविले
जळगाव , 12 मार्च (हिं.स.) नागपूर-मुंबई महामार्गावर, मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरात भीषण अपघातात झाल्याची घटना समोर आलीय. ज्यात एका कारने चौघांना उडवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येत असलेल्या कारने राँग
जळगाव : भरधाव कारने पाच जणांना उडविले


जळगाव , 12 मार्च (हिं.स.) नागपूर-मुंबई महामार्गावर, मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरात भीषण अपघातात झाल्याची घटना समोर आलीय. ज्यात एका कारने चौघांना उडवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येत असलेल्या कारने राँग साइडने येत पाच जणांना धडक दिल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येणाऱ्या कारने पाच जणांना धडक दिलीय. गाडी राँग साइडने आली होती आणि रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या चार मजुरांना उडवलं. या धडकेत प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे जखमी झाले. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर गाडीतील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून उर्वरित तीन जणांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कार राँग साइडने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघा मजुरांना उडवले. कारचा पुढचा भागही चुराडा झाला आहे. अपघातग्रस्त कारला दोन नंबर प्लेट लावण्यात आल्याचं आढळून आलं आहे. तसेच गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि पोलीस वर्दी सुद्धा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची नोंद केली असून, फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande