एआयचे ज्ञान तरुणांना सक्षम करू शकते : डॉ. अपूर्व हिरे
नाशिक, 12 मार्च, (हिं.स.)।आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक ''दुधारी तलवार'' आहे. परंतु, एआयच्या प्रभावाखालील या काळात अद्ययावत ज्ञान निश्चितपणे तरुणांना सक्षम करू शकते, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी के
Knowledge of AI can make


नाशिक, 12 मार्च, (हिं.स.)।आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक 'दुधारी तलवार' आहे. परंतु, एआयच्या प्रभावाखालील या काळात अद्ययावत ज्ञान निश्चितपणे तरुणांना सक्षम करू शकते, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी केले. लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने १० मार्चला आयोजित 'एआय आणि एमएल'वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. सुनील कुटे, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, संदीप विद्यापीठाच्या डॉ. सारिका कोंडेकर होत्या. के. के. वाघ अभियांत्रिकी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात एआय आणि एमएलचे वर्णन 'दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक' असे केले. प्राचार्य डॉ. जगदाळे यांनी शिक्षणाला एआयशी जोडण्याचे आवाहन केले आहे. परिसंवादासाठी भारतातील २६० संशोधकांनी नोंदणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande