बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन महिलांना भरदिवसा लुटले
बीड, 12 मार्च, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मांजरसुंबा आणि धोत्रा शिवारात या घटना घडल्या. काळसर रंगाच्या दुचा
बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन महिलांना भरदिवसा लुटले


बीड, 12 मार्च, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मांजरसुंबा आणि धोत्रा शिवारात या घटना घडल्या. काळसर रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन लुटारूंनी दोन महिलांचे तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे ५४ हजार ६५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले.

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्माकर आहेर या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लुटारूंना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. घडलेल्या या लुटमारीमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande