इराणमधील शाळेवरील हल्ल्यावर अमेरिकन सिनेटरांची पेंटागनकडे स्पष्टीकरणाची मागणी
वॉशिंग्टन, 12 मार्च (हिं.स.)।अमेरिकेत इराणवरील हल्ल्याच्या विरोधात अनेक सिनेटरांनी पेंटागनला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे. ४० हून अधिक अमेरिकन सिनेटरांनी इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करत पेंटागनकडे उत्तराची मागणी केल
इराणमधील शाळेवरील हल्ल्यावर अमेरिकन सिनेटरांची  पेंटागनकडे स्पष्टीकरणाची मागणी


वॉशिंग्टन, 12 मार्च (हिं.स.)।अमेरिकेत इराणवरील हल्ल्याच्या विरोधात अनेक सिनेटरांनी पेंटागनला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे. ४० हून अधिक अमेरिकन सिनेटरांनी इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करत पेंटागनकडे उत्तराची मागणी केली आहे. या हल्ल्यात कथितरित्या १६८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

सांसदांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना लिहिलेल्या पत्रात २८ फेब्रुवारी रोजी मुलांच्या शाळेवर झालेल्या एअर स्ट्राइकमुळे गंभीर चिंता व्यक्त केली असून पेंटागनकडून याबाबत सविस्तर उत्तर मागितले आहे. हे पत्र लिहिणाऱ्या गटात सिनेटर क्रिस व्हॅन होलेन, टिम केन, एलिझाबेथ वॉरेन आणि ब्रायन शॅट्झ यांचा प्रमुख सहभाग आहे. तसेच सिनेटमधील डेमोक्रॅटिक नेते चक शूमर यांच्यासह ४० हून अधिक खासदारांनी या पत्राला पाठिंबा दिला आहे.

सिनेटरांनी पत्रात नमूद केले की, काँग्रेसची मंजुरी न घेता इराणविरुद्ध युद्ध सुरू करण्यात आले. तसेच अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी युद्धादरम्यान अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ७ ते १२ वयोगटातील मुलींची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सिनेटरांनी शाळेवरील हल्ल्यासह सामान्य नागरिकांचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही अमेरिकन लष्करी कारवाईची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली असून चौकशीचे निष्कर्ष लवकरात लवकर सार्वजनिक करावेत आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी सांगितले की अमेरिका या हल्ल्याचा आढावा घेत आहे.

मिनाब येथील हल्ल्याव्यतिरिक्त, संघर्षात मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचे होत असलेले बळी याबाबतही सिनेटरांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी पत्रात नमूद केले की हवाई हल्ल्यांमध्ये अनेक रुग्णालये, सांस्कृतिक वारसा स्थळे तसेच महत्त्वाचे रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि पूल यांनाही लक्ष्य करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. इराणमधील मोठी शहरे आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये, राजधानी तेहरानसह (जिथे सुमारे ९ दशलक्ष लोक राहतात), स्फोटक शस्त्रांचा वापर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या एका वृत्तसंस्थेचा हवाला देत सिनेटरांनी नमूद केले की, १० मार्चपर्यंतच्या संघर्षात १,२४५ हून अधिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून १२,००० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.ज्या शाळेवर हल्ला करण्यात आला ती इराणच्या नौदल तळाजवळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अमेरिकन सुरक्षा दलांनीच हा हल्ला केला का, जर केला असेल तर लक्ष्य काय होते, इमारतीची ओळख पटवण्यासाठी कोणते विश्लेषण करण्यात आले आणि नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली — याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी खासदारांनी पेंटागनकडे केली आहे.तसेच हल्ल्यांचे नियोजन किंवा अंमलबजावणी करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा वापर करण्यात आला होता का, आणि एआयद्वारे निश्चित केलेल्या लक्ष्यांची पडताळणी करण्यासाठी कोणती सुरक्षा व्यवस्था (सेफगार्ड्स) होती, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध संघर्ष सुरू झाल्यानंतर झालेल्या गोलाबारीदरम्यान इराणमधील मिनाब येथील मुलींच्या प्राथमिक शाळेवर एअर स्ट्राइक करण्यात आली. या हल्ल्यात बहुसंख्य मृत्यू लहान मुलांचे झाल्याचे वृत्त आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande