बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागल्याने कारागिराचा मृत्यू
जळगाव, 12 मार्च (हिं.स.) बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागल्याने एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर येथे घडली. आहे. धनराज सुखदेव मिस्तरी असे मृताचे नाव असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृ
बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागल्याने कारागिराचा मृत्यू


जळगाव, 12 मार्च (हिं.स.) बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागल्याने एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर येथे घडली. आहे. धनराज सुखदेव मिस्तरी असे मृताचे नाव असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धनराज मिस्तरी हे हनुमान नगर भागात आपल्या कुटुंबासह वास्ताव्यास आहेत. ते घरातील अंघोळीसाठी गेले बाथरूममध्ये असता बाथरूममध्ये असलेल्या वॉटर हिटरचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धनराज मिस्तरी यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मिस्तरी यांना मृत घोषित केले.घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदिप राजपूत हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande