
नाशिक, 03 मार्च (हिं.स.)भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने रघुभाई भरवाड यांच्या पालावर होळी साजरी करण्यात आली. रघुभाई भरवाड यांच्या पालावर १५० गाई व म्हशी असुन ते गेल्या अनेक वर्षांपासून माडसांगवी शिवारात पालावर राहुन दुग्ध व्यवसाय करतात. रघुभाई भरवाड यांनी त्यांची कन्या राधाला विज्ञान शाखेत पदवीधर शिक्षण दिले आहे.त्यांची मुले,मुली आर पी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. नाशिक महानगर क्षेत्रात भरवाड समाजाची १५०० कुटुंबे पालावर रहात असल्याचे रघुभाई भरवाड यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार,भाजपा म न पा गटनेते ॲड.श्याम बडोदे,भटके विमुक्त आघाडी जिल्हा संयोजक सिद्धेश्वर बापू शिंदे, रवि पाटील,मंडल अध्यक्ष वसंत उशीर,विनायक कस्तुरे,विनोद येवले,अनिता भामरे,जयहिंद शिंदे,रघुभाई भरवाड,राहुल भरवाड,हिरामण भरवाड,रनछोडभाई भरवाड,वजु भरवाड,गोपालाभाई भरवाड,विठ्ठलभाई भरवाड,सहदेवभाई मीर, किसनभाई भरवाड,नेहुल भरवाड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV