जीएसटी चुकवल्याबद्दल ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ४.२४ कोटी रुपयांचा दंड
नवी दिल्ली, 03 मार्च (हिं.स.)। पुरवठा केलेल्या वस्तूंचे चुकीचे वर्गीकरण करून जीएसटी चुकवल्याबद्दल ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ४.२४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीला एकूण ६.३७ कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, या आद
Britannia Industries AI image


नवी दिल्ली, 03 मार्च (हिं.स.)। पुरवठा केलेल्या वस्तूंचे चुकीचे वर्गीकरण करून जीएसटी चुकवल्याबद्दल ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ४.२४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीला एकूण ६.३७ कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, या आदेशाला आव्हान देण्यासाठी उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे.

ब्रिटानियाने मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार हा आदेश केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त, ठाणे कार्यालयाकडून जारी करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीतील आहे. कंपनीने स्पष्ट केले की या नोटीसीमुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. तसेच या आदेशाविरोधात कंपनी कायदेशीर पावले उचलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

कंपनीला हा आदेश सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाकडून जीएसटी कायद्याच्या कलम ७४ अंतर्गत देण्यात आला आहे. पुरवठा केलेल्या वस्तूंचे ‘चुकीचे वर्गीकरण’ केल्यामुळे कर न भरल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. विभागाने कंपनीकडून २.१२ कोटी रुपये कर आणि ४.२४ कोटी रुपये दंड जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण ६.३७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीला व्याजाची रक्कमही अदा करावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande