छगन भुजबळांनी व्यक्त केली एएआयबीच्या अहवालवर शंका
Chhagan Bhujbal expressed
छगन भुजबळांनी व्यक्त केली


नाशिक, 03 मार्च (हिं.स.)।अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्यावर शंका घेण्यासारखे अनेक गोष्टी आहेत त्यामुळे हा अहवाल शंकास्पद वाटत असल्याचे मत राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे

मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. तसेच अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा घातपात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारीला एएआयबीचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालात लँडिंगच्या वेळी विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले, असे नमूद असल्याचे बोलले जाते. त्यानंतर आता या अहवालावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शंका व्यक्त केली आहे.

यावेळी भुजबळ म्हणाले की, बारामतीच्या विमानतळावर शेकडो लोक आणि माध्यम प्रतिनिधी असताना कुणीही अजितदादांचे विमान झाडावर आदळल्याचे सांगितले नाही. विमानाने पहिल्यांदा लँडिंग रद्द करून दुसर्या प्रयत्नात खाली येत असताना ते कलले. त्यामुळे कदाचित कंट्रोल करायला वेळ मिळाला नसेल.जर विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असते, असे म्हणत त्यांनी एएआयबीच्या अहवालावर शंका उपस्थित केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande