रायगड: पोलीस असल्याचा भासवून सोन्याचे दागिने चोरण्याची घटना, ९९ हजारांचा फसवणूक
रायगड, 03 मार्च (हिं.स.) – पेण पोलीस ठाणे हद्दीत दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याचा भास करून ९९ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पेण शहरात खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या माहितीनुस
Fraudsters claiming to be police; jewellery worth Rs 99,000 defrauded in Pen


रायगड, 03 मार्च (हिं.स.) – पेण पोलीस ठाणे हद्दीत दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याचा भास करून ९९ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पेण शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे म्हाडा कॉलनी परिसरात, एयू स्मॉल फायनान्स बँक समोर घडली. फिर्यादी विवेक बिल्डिंग, आमराई म्हाडा कॉलनी, ता. पेण येथे राहतात आणि ते बाजारातून स्कुटरवरून घरी परत येत होते.

दरम्यान, त्यांच्या स्कुटरच्या पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या स्कुटरवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी “सोनं घालून फिरू नका, चोरी वाढल्या आहेत, आम्ही पोलीस आहोत,” असे सांगून फिर्यादींना थांबवले. त्यानंतर त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन व हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. फिर्यादी त्या वस्तू स्कुटरच्या डिकीत ठेवत असताना आरोपींनी हातचलाखीने दागिने चोरून नेले.

या प्रकारात एकूण ९९,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३४/२०२६, बीएनएस कलम ३१८(४), ३(५) अन्वये नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक **सुनील चव्हाण** करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande