नाशिकमध्ये पर्यावरणपूरक सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात
नाशिक, 03 मार्च (हिं.स.) : प्रयागराजमध्ये जसा पर्यावरणपूरक कुंभमेळा यशस्वीरीत्या साजरा झाला, तसाच कुंभमेळा नाशिकमध्येही राबविण्यासाठी रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भोसला शिक्षण संस्थेच्
discussion-with-RSS-volunteers


नाशिक, 03 मार्च (हिं.स.) : प्रयागराजमध्ये जसा पर्यावरणपूरक कुंभमेळा यशस्वीरीत्या साजरा झाला, तसाच कुंभमेळा नाशिकमध्येही राबविण्यासाठी रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भोसला शिक्षण संस्थेच्या डॉ. मुंजे सभागृहात आज सकाळी ज्येष्ठ स्वयंसेवकांशी चर्चा केली.

यावेळी संघाचे शरदराव ढोले, सुहास वैद्य, बाळासाहेब चौधरी, राजेश राव, महेश कर्पे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रयागराज कुंभमेळ्याच्या अनुभवाचे त्यांनी सविस्तर वर्णन केले. प्रयागराजमध्ये दोन हजार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटल्या. तसेच कापडी पिशव्या, जेवणासाठी थाळ्या वाटल्यामुळे तब्बल 29 लाख टन कचरा कमी झाला आणि 140 कोटी रुपयांचा खर्च वाचला.

महाजन यांनी असे उपक्रम नाशिकच्या सिंहस्थातही राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभव आणि व्यवस्थापन नाशिकमध्ये उपयोगी ठरेल आणि पर्यावरणपूरक, सुरक्षित, स्वच्छ व सुदृढ कुंभमेळा घडविण्यासाठी सतत प्रयत्न करावेत.यावेळी नाशिक महापौर हिमगौरी आहेर आडके, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, अनिल भालेराव, रोहीनी नायडु, गणेश कांबळे, सागर वैद्य, अनीता भामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande