स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी विराजमान
नवी दिल्ली, 03 मार्च, (हिं.स.) आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील मानधच्या दमदार का
स्मृती मानधना


नवी दिल्ली, 03 मार्च, (हिं.स.) आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील मानधच्या दमदार कामगिरीमुळे तिला आयसीसी रँकिंग मिळाले. मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ५८ आणि ३१ धावा केल्या.

स्मृती मानधनाचे क्रमवारीमध्ये ७९० गुण झाले आहेत. तिने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरे वोल्वार्डला मागे टाकले आहे. वोल्वार्ड सध्या ७८२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका मार्च आणि एप्रिलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे, त्या दरम्यान वोल्वार्डला मानधनाला मागे टाकण्याची संधी असेल. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी एलिसा हीली ७४४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. बेथ मुनी तिसऱ्या स्थानावर तर अॅशले गार्डनर (७२४) पाचव्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर नवव्या स्थानावर आणि जेमिमा रॉड्रिग्ज १२ व्या स्थानावर आहे.

अलिना किंग (७७५) ने गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे, तिने सोफी एक्लेस्टोनला मागे टाकले आहे. तिने जवळजवळ चार वर्षे अव्वल स्थान पटकावले होते. गार्डनर तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची अलिना एकदिवसीय मालिकेत आघाडीची गोलंदाज होती, तिने १६.७१ च्या सरासरीने सात विकेट्स घेतल्या. तिने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ३३ धावा देत चार विकेट्स घेतल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला १८५ धावांचा शानदार विजय मिळाला. अलिना व्यतिरिक्त, तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाज: गार्डनर (तिसरे), अॅनाबेल सदरलँड (पाचवे) आणि किम गार्थ (आठवे) पहिल्या आठमध्ये आहेत.

गार्डनर (५१६) एकदिवसीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज (४१८) वर ९८ गुणांची आघाडी कायम ठेवली आहे. सदरलँड (५३४) २३ स्थानांनी झेप घेऊन ३४ व्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्ती पाचव्या स्थानावर असून ती अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या १० मध्ये आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande