
बंगळुरु, 03 मार्च,l (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आयपीएल २०२६ मध्ये दोन शहरांमध्ये त्यांचे सामने खेळणार आहे. आयपीएल २०२५ च्या विजयानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती. आणि यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या घटनेनंतर तेथे कोणतेही सामने आयोजित केले गेले नाहीत. पण, आता हे निश्चित झाले आहे की, बंगळुरू संघ त्यांचे पाचही सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे.
यापूर्वी, आरसीबीचे कोणतेही सामने बंगळुरूमध्ये होणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि यामुळे चाहते निराश झाले होते, पण आता संघ पाच सामने खेळणार आहे आणि चाहते विराट कोहलीला त्यांच्या आवडत्या मैदानावर खेळाताना पाहू शकतील. दरम्यान, आरसीबी उर्वरित सामने रायपूरमध्ये खेळणार आहे. पुढील हंगामासाठी बंगळुरूने रायपूरला त्यांचे दुसरे होम ग्राउंड म्हणून निवडले आहे.
आरसीबीने सांगितले की, ते बंगळुरूमध्ये सामने आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी अनेक महिन्यांपासून चर्चा करत आहेत. आयपीएल २०२६ चे उर्वरित दोन होम मॅच रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जातील. बंगळुरूमध्ये सामने आयोजित केल्याबद्दल आरसीबी कर्नाटक सरकार आणि क्रिकेट असोसिएशनचे आभार मानते. गतविजेत्यांचे बहुतेक होम मॅच त्यांच्या होम ग्राउंडवर खेळवले जातील याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.
आरसीबीचे सीईओ राजेश मेनन म्हणाले, चिन्नास्वामी स्टेडियम हे केवळ आमचे होम ग्राउंड नाही. ते असे स्टेडियम आहे जिथे आम्ही खरोखर स्वतःला स्थापित केले आहे. बंगळुरूमधील चाहत्यांची ऊर्जा आमच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे, संपूर्ण स्पर्धेत त्यांना प्रेरणा देत आहे. आमच्या चाहत्यांनी आम्हाला निःशर्त पाठिंबा दिला आहे आणि ते त्यांच्या आवडत्या संघाला त्यांच्या होम ग्राउंडवर खेळताना पाहण्यास पात्र आहेत. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही आमच्या होम ग्राउंडवर पाच सामने खेळणार आहोत आणि आम्ही यासाठी कर्नाटक सरकार आणि पोलिसांचे आभार मानतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे